विमेन्स क्रिकेट लीगमध्ये १२८ महिलांचा सहभाग   

हिंजवडी : रायन इंटरनॅशनल अकादमी, हिंजवडीने  आयोजित केलेली विमेन्स क्रिकेट लीग २०२५ ला मोठे यश मिळाले, जेथे टॅलेंट, टीमवर्क आणि समुदायामधील महिला क्रीडासाठी वाढत्या उत्साहाला साजरे करण्यात आले. या स्पर्धेत यशविन, टिनसेल काउंटी, मेगापोलिस, टिनसेल टाउन, हाय माँट आणि मेलेंज यांसारख्या विविध निवासी सोसायटींमधील १६ संघांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या १८ ते ५० वर्ष वयोगटातील १२८ महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धा खडतर होती, जेथे टिनसेल टाउन, हाय माँट, मिनज, इऑन होम्स आणि लाईफ रिपब्लिक यांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. रोमहर्षक अंतिम सामन्यात, इऑन होम्सने विजेतेपद पटकावले, तर टिनसेल टाउनने उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेत पालकांचा सक्रिय सहभाग देखील दिसून आला, ज्यामध्ये सुमारे ३० ते ४० माता सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेला स्थानिक समुदायांकडून उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे महिला क्रीडाचे महत्त्व अधिक दृढ झाले आहे.
 
ही स्पर्धा जिंकणार्‍या इऑन होम्स संघाला ट्रॉफी, सुवर्णपदक आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तर उपविजेत्या टिनसेल टाउन संघाला रौप्यपदक आणि सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. विजेत्या आणि उपविजेत्या संघांच्या सन्मानाव्यतिरिक्त इतर संघांना देखील सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.विमेन्स क्रिकेट लीग २०२५ ने महिलांना त्यांचे क्रीडाकौशल्य दाखववण्याची संधी दिली, तसेच क्रीडा विश्वातील आत्मविश्वास, मैत्री व सर्वसमावेशकता विकसित करण्यामध्ये साह्य देखील केले. रूढीवाढी संकल्पनांना मोडून काढत सहभागाला सक्रियपणे चालना देत या इव्हेण्टने समुदायामध्ये सकारात्मक प्रभाव जागृत केला, ज्यामुळे स्पर्धात्मक खेळांमध्ये भाग घेऊ इच्छिणार्‍या महिलांची संख्या वाढली.
 
निवासी सोसायट्यांसोबत कोणताच सहयोग नसलेल्या हिंजवडी येथील रायन इंटरनॅशनल अकॅडमीने सुरू केलेला हा उपक्रम क्रीडा विश्वामध्ये व बाहेर टॅलेंटला प्रोत्साहन देणे आणि महिला सक्षमीकरणाला नव्या उंचीवर नेणे या संस्थेच्या मनसुब्याला अधिक दृढ करतो.
 

Related Articles